Sharad Pawar | शरद पवारांवर शहाजी बापू पाटलांनी उधळली स्तुतीसुमने; कार्यकर्त्यांच्या भुवया उंचवल्या

Sharad Pawar | सांगोला: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील सांगोल्यात बाबुराव गायकवाड यांच्या 25व्या कार्यक्रमाप्रसंगी एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमन उधळली. पवारांबद्दल बोलत असताना शहाजीबापू पाटील भावुक झाले. मी आज पवार साहेबांना तब्बल दहा वर्षांनी भेटत आहे, असे सांगत आमदार शहाजीबापू पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

“मी आमदार असताना शरद पवारांनी अख्खा दिवस मला दिला होता. त्यांनी सांगोला तालुक्यामध्ये माझ्यासोबत बरेच कार्यक्रम केले होते. आज मला या कार्यक्रमाला बोलावलं नसतं, तरी मी येऊन पवार साहेबांचं दर्शन घेऊन परतलो असतो”, अशा भावना शहाजीबापू यांनी यावेळी व्यक्त केल्या.

पुढे बोलताना ते म्हणाले, “सांगोला तालुका आणि बारामतीचे एक अनामिक नातं आहे. हे नातं माणसाचं नाही तर दैव आणि भगवंताचं नातं आहे. श्रीधर स्वामींचा जन्म नीरा नदीकाठी नाझरे या ठिकाणी झाला. श्रीधर स्वामी यांनी लिहिलेला शिवलीलाअमृत ग्रंथ सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि तो सगळीकडे वाचला जातो. स्वामींचा जन्म जरी नाझऱ्यातला असला तरी त्यांनी शिवलीलाअमृत बारामतीच्या महादेव मंदिरात बसून लिहिला आहे. हेच नातं बारामती आणि सांगोल्याचा आहे.”

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील सांगोल्यात बाबुराव गायकवाड यांच्या 25व्या कार्यक्रमाप्रसंगी एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार दीपक साळुंखे व इतर मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या