Sharad Pawar | शरद पवारांसमोर सुषमा अंधारे भावुक, बोलताना अश्रू झाले अनावर
Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. या कार्यक्रमामध्ये भाषण करताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) भावुक झाल्या. शरद पवार यांच्याबद्दल बोलत असताना त्यांना अश्रू रोखता आले नाही.
सुषमा अंधारे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी 2 मे रोजी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे पवारांनी राजीनामा माघारी घेतला. यावेळी सुषमा अंधारे यांनी देखील शरद पवारांना पत्र पाठवले होते. ते पत्र अंधारे यांनी शरद पवारांना वाचून दाखवलं. हे पत्र वाचताना त्यांना त्यांचे अश्रू आवरता आले नाही.
सातारा येथे भारतीय भटके विमुक्त विकास संशोधन संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुषमा अंधारे आणि शरद पवार यांची उपस्थिती होती. यावेळी अंधारे यांनी पवारांना (Sharad Pawar) लिहिलेलं भावनिक पत्र वाचून दाखवलं. हे पत्र वाचताना त्यांना अश्रू आवरता आले नाही. रडतच त्यांनी ते पत्र वाचून दाखवलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- MI vs RCB | आरसीबी विरुद्ध होणाऱ्या सामन्यातून रोहित शर्मा आऊट?
- Supreme Court | सुप्रीम कोर्टाच्या निकाला आधी शिंदे राजीनामा देणार; मोठ्या वकिलाच विधान
- Sharad Pawar – घरामध्ये प्रत्येकाला माहीत, पक्ष पुढे कसा जाणार – शरद पवार
- Supreme Court | “राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल…” ; सुप्रीम कोर्टाचा निकालाआधी शिंदे गटाच्या नेत्याचं विधान
- IPL 2023 | सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू आयपीएल हंगामातून बाहेर
Comments are closed.