Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (2 मे) पार पडले. या पुस्तकातून शरद पवार यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहे. ते आता कोणतीही निवडणूक लढणार नाही, त्याचबरोबर राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा पवारांनी केली आहे. त्यांच्या या खुलासानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही नवीन समिती अध्यक्ष पदाबाबत पुढे निर्णय घेईल, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले आहे. पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
आज बोलत असताना शरद पवार (Sharad Pawar) राजकीय आठवणींमध्ये गुंग झाले होते. ते म्हणाले, “आमचं घराणं काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षांच्या विचारांचं होतं. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमध्ये आम्ही काँग्रेसच्या जवळ आलो. त्याचबरोबर मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो होतो. त्यानंतर मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झालो.”
पुढे बोलताना ते म्हणाले, ” 1967 साली मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी विविध पदांवर काम केलीत. तेव्हापासून राजकारणात मी आहे. यानंतर आता फक्त तीन वर्ष मी राजकारणात राहणार आहे.” पवारांच्या (Sharad Pawar) या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane | अजित दादाला सर्व माफ; ते करमुक्त – नितेश राणे
- Dry Skin | कोरड्या त्वचेच्या समस्येवर मात करण्यासाठी दुधाच्या मलाईच्या ‘या’ पद्धतीने करा वापर
- Chitra Wagh | “उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळावं मग मुंबईची काळजी करावी” : चित्रा वाघ
- National Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ‘या’ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध
- National Housing Bank | नॅशनल हाऊसिंग बँक यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज