Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात खवळली होती. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पवारांनी राजीनामा मागे घेतला. यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्व घडामोडींवर दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. या अग्रलेखातून पवारांवर टीकास्त्र चालवण्यात आलं आहे.
शरद पवार (Sharad Pawar) हे एक राष्ट्रीय नेते आहे. शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार हे समीकरण आहे. पवारांनी पक्ष स्थापन केला आणि टिकवला. मात्र, शरद पवार वारस निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे. पवार त्यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व उभे करू शकले नाही. राजकारणामध्ये शरद पवारांच्या शब्दाला मान आहे. पण पक्ष पुढे नेणारा वारसदार ते निर्माण करू शकले नाही, असं दैनिक सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी हादरली होती. कारण पवारांनंतर आपले कसे होणार? असा सवाल राष्ट्रवादीत निर्माण झाला होता. पवारांनंतर राष्ट्रवादी सांभाळायला कुणीही वारस नाही. त्यामुळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि पवारांनी राजीनामा मागे घ्यावा लागला, असं देखील या अग्रलेखात म्हटलं आहे.
शिवसेना फोडल्यानंतर भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडायचा होता. भाजपचा यासाठी प्लॅन देखील तयार होता. मात्र, शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला आणि भाजपचा प्लॅन कचऱ्यात गेला, अशी खोचक टीका या अग्रलेखातून भाजपवर करण्यात आली आहे.
पवारांच्या राजीनाम्याला भाजपाने नौटंकी असं म्हटलं होतं. भाजप हा एक पोटदुखी पक्ष आहे. दुसऱ्याचं चांगलं घडावं असं भाजपला कधीच वाटत नाही. इतरांचे पक्ष मोडून हा पक्ष उभारला गेला आहे, असा टोला या अग्रलेखातून भाजपला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | मोचा चक्रीवादळामुळे वातावरणात होणार मोठा बदल, जाणून घ्या
- Nana patole | …म्हणून महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत नाना पटोलेंची भूमिका स्पष्ट
- Raj Thackeray – राज ठाकरेंनी सांगितले शरद पवारांचे राजीनामा मागे घेण्याचे खरं कारण
- Uddhav Thackeray | महाडमधील जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर सडकून टीका !
- Raj Thackeray | रत्नागिरीमधील सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल ; म्हणाले …