Sharad Pawar | “शहाण्या माणसाबद्दल प्रश्न विचारा”; चंद्रकांत पाटलांचं नाव घेताच शरद पवारांची जहरी टीका

Sharad Pawar | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. शरद पवार यांना चद्रकांत पाटीलांबाबत प्रश्न विचारताच “शहाण्या माणसाबद्दल विचारा”, असं म्हणत शरद पवार यांनी पत्रकारांचा प्रश्न धुडकावून लावला. यावेळी शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांचा चांगलाच पाणउतारा केल्याचे पहायला मिळाले आहे.

Sharad Pawar Criticize Chandrakant Patil

कसब्याचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना शरद पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

“हा फक्त रवींद्र धंगेकरांचा विजय आहे. महाविकास आघाडीचा नाही”, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते. शरद पवार यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावरुन त्यांनाही चिमटे काढले आहेत.

Sharad Pawar Criticize Devendra Fadnavis

“ज्यांचा विजय झाला असे विजय देणारे उमेदवार आमच्या सर्वांचे होते हे तरी त्यांनी मान्य केलं. या निवडणुकीच्या आधी त्यांची काय विधाने होती. हे वाचनात आले होते. त्यात आता गुणात्मक बदल झाला आहे. कमीत कमी निवडून आलेल्या व्यक्तीबद्दल ते चांगलं बोलतात ही चांगली गोष्ट आहे”, असा चिमटा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना काढला आहे.

कसब्याची निवडणूक हिंदुत्वावर गेली??

कसब्याची निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेण्याचा भाजपचा प्रयत्न होता. या प्रश्नावरही त्यांनी थेट उत्तर दिलं. “ही निवडणूक हिंदुत्वावर गेली की नाही हे मला माहीत नाही. महाविकास आघाडीसाठी सर्व नेते, पदाधिकारी काम करत होते. उमेदवाराबद्दल सर्व स्तरात चांगलं बोललं जात होतं. त्याचा हा परिणाम आहे. मी लोकांना विचारलं. बहुसंख्य लोकांनी सांगितलं आघाडीचा उमेदवार म्हणून आम्ही मतदान केलं. धंगेकरांबद्दल लोकांची मान्यता होती. धंगेकरांनी केलेल्या कामाची नोंद या भागातील लोकांनी घेतली”, असंही यावेळी शरद पवारांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.