Sharad Pawar | शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या ‘या’ नेत्याला राष्ट्रवादीतून बडतर्फ

Sharad Pawar | जळगाव: महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात दररोज काही ना काही नवीन घडामोडी घडत असतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. तर पक्षामध्ये बंडखोरी करत असलेल्या नेत्यांना बडतर्फ करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दर्शवणाऱ्या राष्ट्रवादीच्या संजय पवार यांना राष्ट्रवादीने दणका दिला आहे. संजय पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजप आणि शिंदे गटाला संजय पवारांचा पाठिंबा (Sanjay Pawar’s support to BJP and Shinde group)

संजय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना जिल्हा दूध संघाची निवडणूक आणि जिल्हा बँकेची निवडणूक, या दोन्ही निवडणुकींमध्ये भाजप आणि शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला होता. शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठिंबावरच संजय पवार जिल्हा बँकेत अध्यक्ष झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मात्र, सतत पक्षासोबत बंडखोरी या कारणामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे.

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांकडून वरिष्ठ पातळीवर संजय पवार यांच्या बद्दल तक्रारी आल्या होत्या. या सर्व तक्रारींची दखल घेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबत पत्र जारी केलं आहे.

दरम्यान, संजय पवार यांनी गिरीश महाजन यांना वर्तमानपत्र जाहिरातीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. या जाहिरातीमध्ये त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो वापरला होता. त्यांच्या या कृत्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होते.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3IlEu4Q