Sharad Pawar | सिल्व्हर ओकची महत्वपूर्ण बैठक संपली; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला पवारांचा निर्णय

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर आज मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवड समितीमार्फत पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्ष पदावर कायम राहावे, अशी विनंती समितीने केली आहे.

शरद पवारांनी (Sharad Pawar) हा राजीनामा मागे घ्यावा, असा आग्रह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. त्याचबरोबर निवड समितीने देखील शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केला आहे. निवड समितीने घेतलेला निर्णय सांगण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि पक्षातील पदाधिकारी शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर गेले होते. तिथे झालेल्या बैठकीबद्दल प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी माहिती दिली आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवड समितीचे म्हणणे ऐकून घेतले आहे. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांकडून शरद पवारांना तातडीने निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे. तुमचा प्रस्ताव माझ्यापर्यंत पोहोचला आहे. आता मला थोडा वेळ द्या मी विचार करून निर्णय सांगतो, असं पवार यावेळी म्हणाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू असताना कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांच्या या सर्व हरकतीनंतर शरद पवार (Sharad Pawar) दबावाखाली येऊन आपला निर्णय बदलतील का? याकडं सर्वांचे लक्षं लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या