Sharad Pawar | “…हे या राज्यपालांचं वैशिष्ट्ये आहे”, शरद पवारांनी घेतला राज्यपालांचा समाचार

Sharad Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. कोश्यारी यांनी छत्रपची शिवाजी महारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरुन राज्यातील राजकारण तापलेलं आहे. अनेक नेत्यांनी राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.

यावेळी, राज्यपाल जेव्हा बोलले तेव्हा तिथे मी आणि नितीन गडकरी होतो. त्यांनी तो उल्लेख केला. तो माझ्याबद्दल नव्हता. गडकरींबद्दल होता, असं शरद पवार म्हणाले. अनेक गोष्टींवर वादग्रस्त विधाने करणं हे या राज्यपालांचं वैशिष्ट्ये आहे. आणि तसा त्यांचा लौकीक आहे. चुकीची विधानं करणं, समाजात गैरसमज कसा माजेल याची खबरदारी घेणं असं त्यांचं मिशन आहे की काय ही शंका येते, असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्या असल्याचा घणाघात देखील शरद पवारांनी केला आहे.काल त्यांनी शिवाजी महाराजांचं कौतुक केलं. पण राज्यातून उमटलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांना उशिरा सूचलेलं हे शहाणपण होतं, राज्यपालांच्या विधानाची दखल आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीच घ्यावी, अशा व्यक्तीकडे अशा जबाबदाऱ्या देणं योग्य नाही, असा संताप पवारांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.