Sharad Pawar । “गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मी जाहीर केलं होत कि…”; शरद पवारांचा मोठा खुलासा

Sharad Pawar | मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले आहे. तसेच हि निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन देखील केलं आहे. राज ठाकरेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

शरद पवारांची प्रतिक्रिया-

राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले कि, प्रत्येक पक्षाला आपली भूमिका घ्यायचा अधिकार आहे. तसे राज ठाकरेंनी भूमिका घेतली असेल तर त्यावर हरकत घेण्याची गरज नाही. पण गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती, त्यावेळी मी स्वतः त्यांच्या घरातील कुणी उमेदवार असेल तर मी उमेदवार देणार नाही असे जाहीर केले होते.रमेश लटके यांनी महानगरपालिका, विधिमंडळातील योगदान आणि उरलेला कालावधी पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी असेही मत पवारांनी मांडले आहे.

तसेच उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात इतर पक्षांनी उमेदवार देऊ नये अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. ऋतुजा लटके यांच्या विरोधातील अर्ज मागे घ्यावा. अजूनही उमेदवार मागे घेण्यासाठी वेळ असल्याचेही शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे अशी माझी इच्छा आहे. दीड वर्षांच्या कालावधीसाठी राजकारण नको असेही शरद पवार म्हणाले.

राज ठाकरे यांचं फडणवीसांना पत्रातून अवाहन-

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपनं निवडणूक लढवू नये, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका असं म्हणत राज ठाकरेंनी ट्वीट केलं आहे. एखाद्या नेत्याचं निधन झाल्यावर त्याच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास पोटनिवडणूक बिनविरोध होते. हा इतिहास आहे, असंही या पत्रात नमूद केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.