Sharad Pawar । “…त्यामुळे मी निवडणुकीत कधीही राजकारण करत नाही”, भाजपच्या माघारीनंतर शरद पवारांचे वक्तव्य
(Sharad Pawar) मुंबई : अंधेरी पूर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. अशातच भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) यांनी माघार घेतली असल्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये भाजप माघार घेईल याची मला खात्री होती. काही तरी सकारात्मक निर्णय घेतला जाईल. अखेर त्यांनी निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मी समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. तसंच, राज ठाकरे यांना याचे श्रेय द्यायचे असेल तर देऊन टाका, असा टोलाही पवारांनी लगावला. निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं सांगताच शरद पवारांनी “सहा ते सात अपक्ष आहेत. एक जरी अपक्ष उभा राहिला तर निवडणूक होईल,” असं सांगितलं.
एमसीए निवडणुकीमुळे अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला होता, यावर पवार म्हणाले,” मी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी उभाही नाही. एमसीए ही पक्षाची किंवा संघटनेची निवडणूक नाही. त्यामुळे या निवडणुकीत मी कधीही राजकारण करत नाही. त्यामुळे त्याचा आणि अंधेरी पोटनिवडणुकीचा संबंध नाही, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केलं.
“माझी भाजपाकडे कोणतीही मागणी नव्हती. मी त्यांना कसं काय सुचवू शकतो. मी फक्त सल्ला दिला होता. सुचवल्यानंतर काहीतरी सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी आशा होती. तसा निर्णय घेतला याचा आनंद आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं. माघार घेण्यासाठी आवाहन करण्यास उशीर झाला का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की “माझ्या दृष्टीने निर्णय झाला हे महत्वाचा आहे. हे असे निर्णय पटकन होत नसतात. त्यासाठी चर्चा, अभ्यास करावा लागतो”, असंही पवार म्हणले.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare । “भाजप तुमचं ऐकत असेल तर एवढी दोन पत्रं लिहाच”, सुषमा अंधारेंची राज ठाकरे यांना विनंती
- Manisha Kayande | अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची माघार, मनिषा कायंदे यांची प्रतिक्रिया
- Health Care Tips | आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या अश्वगंधा बद्दल, जाणून घ्या
- Sharad Pawar | माझी मागणी नव्हती…सल्ला होता ; भाजपच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया!
- Moto’s New Mobile Launch | Motorola चा Moto E22s मोबाईल भारतात लाँच
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.