Sharad Pawar । रमेश केरे यांनी मागील १० ते १५ दिवसांपूर्वी मला मेसेज केले; शरद पवारांचा मोठा खुलासा

Sharad Pawar | मुंबई : काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे-पाटील (Ramesh Kere Patil) यांनी काल फेसबुक (Facebook) लाईव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न केला. माझी बदनामी केली जात आहे. मात्र, मी आजपर्यंत समाजासाठी प्रामाणिक काम केलं आहे. मात्र, आता हे माझं तुमच्याशी फेसबुकच्या माध्यमातून शेवटच संभाषण असणार आहे, असे रमेश केरेंनी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमाद्वारे म्हटलं होत. आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांची प्रतिक्रिया –

काल मुंबईत पवारांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले कि, रमेश केरे यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत माझ्याकडे अधिक माहिती नाही. ज्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ते कदाचित औरंगाबादचे आहेत. मागील १० ते १५ दिवसांपूर्वी त्यांनी मला तुम्हाला भेटायचे आहे, चर्चा करायची आहे, अशा आशयाचे दोन ते तीन मेसेजेच केले होते. मात्र त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्याची टोकाची भूमिका घेतली आहे असे समजत आहे. त्याची माहिती मी घेईन, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

नेमकं घडलं काय?

मुंबईतील चर्चगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे-पाटील यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून एका ऑडिओ क्लिपमुळे मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर आज रमेश केरे यांनी आज फेसबुकवर लाईव्ह करून उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यावर चुकीचे आरोप झाले. त्यामुळे माझी नाहक बदनामी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्याजवळच्या माणसांनी मला त्रास दिला असा आरोप करत केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मी त्यांच्या नावाला विरोध केला होता. त्यामुळे जाणीवपूर्वक मला बदनाम केले जात आहे. मी कधी असं काही केलं नाही, मी समाजासाठीच काम केलं आहे, समाजाला न्याय मिळावा यासाठी केलं आहे. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे, असं म्हणत रमेश केरे यांनी औषध प्राशन केलं. यानंतर आता या सर्व गोष्टींचा तपास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.