राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ मानद पदवी प्रदान

अहमदनगर : आज अहमदनगर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५वा दीक्षांत समारंभ साजरा झाला. या समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. नानासाहेब पवार सभागृहात ३५ व्या पदवीदान समारंभ पार पडला.

यावेळी शरद पवार यांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे मन:पूर्वक आभार मानले. तसेच, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५वा दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला. या समारंभात डॉक्टरेट ऑफ सायन्स या मानद पदवीने मला सन्मानित करण्यात आले. या बहुमानासाठी मी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

दरम्यान, कृषी विकास आणि कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारात अग्रेसर असणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून हा गौरव प्राप्त होणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी कृतज्ञतापूर्वक या सन्मानाचा स्वीकार करतो. देशभरातल्या ज्या असंख्य शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून अलोट प्रेम केले, त्या शेतकऱ्यांना मी हा सन्मान समर्पित करतो, अशा भावना यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केल्या.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा