शरद पवार यांचा वाढदिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा होणार

शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १२ डिसेंबर हा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळीराजाला समर्पित करणार आहे. हा दिवस पक्षातर्फे बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला जाणआर आहे. या दिवशी साहेब ८० व्या वर्षात पदार्पण करत असल्याने ८० लाख रुपयांचा धनादेश पवार साहेबांकडे सुपूर्द केला जाईल. हा धनादेश राष्ट्रवादी वेलफेअर फंडमधून थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल व यातून अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जाईल, अशी माहिती आज मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१२ डिसेंबर रोजी पवार साहेब सकाळी १०.३० ते दुपारी १ पर्यंत मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे उपस्थित राहून शुभेच्छांचा स्वीकार करणआर आहेत. यावेळी शुभेच्छुकांनी पुष्पगुच्छ किंवा हार आणणे टाळून स्वयंप्रेरणेने बळीराजाच्या निधीसाठी मदत करावी, असे आवाहन मलिक यांनी केले. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मुंबईतील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम घेतला जाईल. मुंबईतील शासकीय तसेच महानगरपालिकेतील रूग्णालयातस्वच्छता अभियान राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.