InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

निधी चौधरी यांच्यावर कारवाई करा- शरद पवार

महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पवार यांनी लेखी मागणी केली आहे.

चौधरींवर कडक कारवाई करावी जेणेकरुन अशा प्रकारची पुनरावृत्ती घडणार नाही. कारवाई न झाल्यास राज्य सरकारची महापुरुषांबाबतची निती खालच्या स्तरावर पोहोचली असा समज होईल, असा सल्लाही पवार यांनी दिला आहे.

गांधीजींची हत्या करणाऱ्याचे समर्थन मी कधीच करणार नाही. काही लोक या ट्वीटचा राजकीय लाभ उठवू पाहात आहेत, हे दुर्दैवी आहे. गांधीजींचा अवमान करण्याचा मी स्वप्नातही विचार करु शकत नाही. असं स्पष्टीकरण निधी यांनी आपल्या विविध ट्विटमध्ये दिलं आहे.

तापसी पन्नूचा ‘मिशन मंगल’ मधील पहिला लूक तुम्ही पाहिलात का ?

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.