InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘आता कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी’

- Advertisement -

आज अनेक लोक पक्ष सोडत आहे. मात्र जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे त्यामुळे पक्षगळती होत आहे. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. आता कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत ते बोलत होते. महिलांवरील अत्याचार व विकृत मनस्थितीवर जरब बसण्याची यंत्रणा ढिसाळ झाली आहे. राज्यकर्ते महिलांना सन्मानाने वागणूक देत नाहीत ते यंत्रणा काय चालवणार?, अशा शब्दात पवार यांनी सरकारवर टीका केली.

निवडणुकीला सामोरे जाताना माझा आग्रह आहे की तरुणांना आणि महिलांना पुढाकार देण्याचे काम करावे. नवीन चेहरे समोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीने करण्याचा विचार केला जाईल, असेही पवार म्हणाले.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.