InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पंतप्रधान युद्धनौकांनी फिरत असेल तर त्यात चुकीचे काय? शरद पवारांचा मोदींना सवाल

राजीव गांधी यांनी आयएनएस विराट युद्धनौकेचा वापर कौटुंबिक सहलीसाठी केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.

देशाच्या पंतप्रधानाने युद्धनौकेने फिरण्यात गैर काय आहे, असा सवाल पवारांनी मोदींना विचारला.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मी स्वतः संरक्षण मंत्री होतो. त्यावेळी मी सुद्धा युद्धनौकांनी अंदमानला गेलो होतो. या युद्धनौका सतत फिरत असतात. यात जर देशाचा पंतप्रधान युद्धनौकांनी फिरत असेल तर त्यात गैर काय आहे? उलट अशा दौऱ्यांमुळे युद्धनौकांवरची नेमकी कार्यपद्धती काय, याचा अभ्यास होतो, असे पवारांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply