लहान मुलाबरोबर कुस्ती खेळल्यावर पैशांऐवजी रेवड्या मिळतात, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमधील प्रचारसभेत पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पहिलवानाच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. कुस्ती कुणासोबत खेळायची हे ठरवावं लागतं. लहानमुलांसोबत कुस्ती खेळल्यास पैशांऐवजी रेवड्या मिळतात, असं म्हणत पवारांनी फडणवीसांना कोपरखळी लगावली. ते पिंपळगाव बसवंत येथे महाआघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते. सभेतील गर्दी बघून निफाडची जागा यावेळी महाआघाडीचा उमेदवार नक्की जिंकेल, असंही त्यांनी नमूद केलं.

शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणाले आमचा पहिलवान तेल लावून तयार आहे. मात्र, कुस्ती खेळतांना कुणासोबत कुस्ती खेळायची हे ठरवायचं असतं. लहानपणी जत्रेत कुस्ती खेळायचो. तेव्हा पैशांऐवजी रेवड्या द्यायचे. त्यामुळे लहान मुलांबरोबर कुस्ती खेळावी का हे ठरवावे लागते.” मी राज्याच्या सगळ्या कुस्ती संघांचा अध्यक्ष राहिलो आहे, असंही पवारांनी यावेळी नमूद केलं.

Loading...

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.