Sharad Pawar | “ED चा गैरवापर…”; शरद पवारांचं राज्य सरकारवर टीकास्त्र

Sharad Pawar | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आयएल अँड एफएस प्रकरणी ईडी चौकशी (ED inquiry) सुरू आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडी सारख्या तपास यंत्रणेचा गैरवापर कसा केला जातो हे याचे उदाहरण आहे, अशा खोचक शब्दात शरद पवारांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “जयंत पाटील यांच्या चौकशी बद्दल पूर्ण माहिती माझ्याकडे आलेली नाही. मात्र, महाराष्ट्रामध्ये  चांगले काम करणारे प्रशासक असं जयंत पाटलांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावलं यात काहीच कमीपणा नाही. कारण ईडी सारख्या तपास यंत्रणेचा गैरवापर कसा केला जातो याचं हे एक उदाहरण आहे.”

Sharad Pawar’s criticism of the state government

पुढे बोलताना ते (Sharad Pawar) म्हणाले, “ज्या लोकांची चौकशी ईडीने केली आहे, आमच्याकडे त्यांची यादी आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या दहा लोकांना चौकशीसाठी बोलावलं गेलं आहे. तर काही लोकांवर ॲक्शन झाली आहे. अनिल देशमुख यांच्यावर दहा कोटी घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. आरोप पत्र दाखल केल्यानंतर ती रक्कम 20 कोटीवर आली. आधी लोकांना बदनाम केलं आणि आता सांगतात रक्कम तितकी नाही.”

दरम्यान, जयंत पाटील यांना आयएल अँड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी ईडी  चौकशीला सामोरे जावे लागत आहे. काल (22 मे) तब्बल नऊ तास त्यांची ईडी चौकशी झाली.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3oqyJfn