InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘वय झाल्यामुळे लोकसभा लढवू नये’ असं सुचवणाऱ्या चंद्रकांत पाटलांना पवारांनी दिले उत्तर..

शरद पवार यांनी या वयात लोकसभा निवडणूक लढवू नये, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. या सल्ल्यावर शरद पवार यांनी  चंद्रकांत पाटील याना चोख उत्तर दिले आहे. भाजप नेत्यांनी माझ्या तब्येतीची काळजी करु नये, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

पवारांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. अतिसामान्य माणसांच्या कामाबद्दल ते स्वत: धावपळ करतात. मात्र, आमच्या वयातील अंतर पाहता मी त्यांना सल्ला देणे माझे काम समजतो. एका लोकसभा मतदार संघात किमान सहाशे गावे असतात. त्यामुळे वयाचा विचार केल्यास एवढ्या गावात प्रचार करणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे त्यांनी या वयात लोकसभेची निवडणूक लढवू नये. असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी पवारांना दिला होता.

तसेच माढा मतदारसंघ भाजपाला मिळाल्यास आम्ही पवारांचा नक्कीच पराभव करू, अशीही  भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली होती.

अण्णा हजारे यांच्या उपोषण या विषयावर बोलणे आणि बातम्या वाचणे मी गेली दोन वर्षे सोडून दिलं आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे बैठक पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ‘अण्णा हजारे यांच्याविषयी काही पाहणे आणि बोलायचे नाही असं मी दोन ते तीन वर्षांपूर्वीच ठरवले आहे. त्यांच्याबद्दल कुठलंही वृत्त छापून आलं तरी मी ते वाचत नाही,’ असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर शरद पवारांचं सूचक वक्तव्य…

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती विजयसिंह मोहिते पाटील आणि जवळपास सर्व वरीष्ठ सहकाऱ्यांनी केली. परंतु, माझी निवडणूक लढवण्यावर इच्छा नसून कोणताही निर्णय घेतला नाही, पण विचार करून निर्णय घेईल.’

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तर त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल’, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

‘माढा मतदारसंघातून शरद पवारचं उभे राहणार’

शरद पवार यांच्या उमेदवारीला शेतकरी कामगार पक्षाने देखील पाठिंबा दिला आहे. माढा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार यावर मोठी चर्चा सुरु झाली होती. पण आता आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच माढा मतदारसंघातून उभे राहतील असे विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्पष्टच केले आहे.

माढातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील शरद पवार यांनी येथून निवडणू्क लढावी अशी मागणी केली होती. पण शरद पवार यांनी माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नसून मी विचार करून निर्णय घेईल असे स्पष्ट केले होते.

साताऱ्यात उदयनराजेंना राष्ट्रवादीचं तिकीट फायनल..?

साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी  शरद पवारांची सातारच्या पत्रकारांसमवेत दिल्लीत भेट घेतली. उदयनराजेंचं तिकीट फायनल असल्याचे संकेत यावेळी शरद पवारांनी दिले. उदयनराजेंना सातारामधून शरद पवारांनी ग्रिन सिग्नल दिला अशा सध्या चर्चा आहे

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत असलेल्या ११ मतदारसंघात कोण उमेदवार आहेत, हे जवळपास निश्चित झाले आहे.

माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी लोकसभा लढवण्याचे कारण काय?

मध्यतंरी शरद पवार माजी आमदार विनायकराव पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कुर्डुवाडीत झालेल्या जाहीर कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी जि.प.अध्यक्ष संजयमामा शिंदे हे जिल्ह्यात चांगल्या पध्दतीने काम करीत आहेत असे जाहीर वक्तव्य केले होते. त्यावेळी व्यासपीठावर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे व अन्य पक्षाचे सर्वच मान्यवर उपस्थित होते.

पवार यांच्या वक्तव्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. माढा मतदार संघामध्ये विजयदादांच्या बरोबरच प्रभाकर देशमुख, दिपक सांळुखे-पाटील, संजयमामा शिंदे अशी नावे राष्ट्रवादीच्या वतीने पुढे आलेली आहेत.

परिस्थितीचा विचार केला तर विजयदादांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपच्या वतीने जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड घेतलेले संजयमामा यांना खुले आमंत्रण असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकेकाळी जिल्हा राजकारणावर पकड असणारे विजयदादा हे आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळायलाच हवी यासाठी आग्रही नसल्याचे दिसून येते. त्यामुळे माढा चा ‘तिढा’ सोडविण्यासाठी शरद पवार स्वतः रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.