खुद्द शरद पवार साताऱ्यात दाखल! शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर बंद दाराआड खलबतं

सातारा : जिल्हा बँक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या झालेल्या पराभवामुळं त्यांचे समर्थक कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी थेट पक्षाच्या कार्यालयावरच दगडफेक केली आहे. शिंदे समर्थकांनी थेट पक्षालाच आव्हान दिल्याचं बोललं जात असताना, शिंदे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. ‘माझ्या कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात चूक झाली आहे, असाही ते म्हणाले.

तसेच मी पवार साहेबांची माफी मागतो, पण माझ्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न किती झाले याबद्दल मला शंका आहे, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं येत्या काळात राष्ट्रवादी अंतर्गत संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. शशिकांत शिंदे यांना रांजणे यांच्याकडून अवघ्या एका मतानं पराभव पत्करावा लागला आहे. शशिकांत शिंदे यांना आपल्याच पक्षाच्या नेत्यांनी पराभवाचा धक्का दिल्याचं सध्या साताऱ्यात बोललं जात आहे.

शशिकांत शिंदे यांनी पराभवानंतर चौफेर टीका केली आहे. शशिकांत शिंदे यांच्याशी पराभवावर चर्चा करण्यासाठी दस्तूरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे साताऱ्यात दाखल झाले आहेत. साताऱ्याच्या विश्रामगृहात शशिकांत शिंदे आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे. साताऱ्यात जेव्हा 2019 विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा पराभव झाला होता तेव्हा सुद्धा शरद पवार हेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले होते. आताही शरद पवार यांनी शिंदे यांच्या पराभवावर सुचक वक्तव्य केलं आहे. पक्षातील गटबाजीवर भाष्य करणं पवार यांनी टाळलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा