InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नरेंद्र मोदींचे वागणे, बोलणे पंतप्रधान पदाला शोभत नाही- शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नगरमध्ये सभा पार पाडली. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदींचे बोलणे पंतप्रधान पदाला शोभणारे नसल्याचे, यावेळी पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, मी काँग्रेसबरोबर कसा, असे पंतप्रधान मला विचारतात, मात्र माझी सुरुवात काँग्रेसपासून झाली आहे, काही मतभेद झाले म्हणून मी गांधी-नेहरुंचे तत्वज्ञान सोडले नाही, गांधी-नेहरुंचे तत्वज्ञान मोदींना कधीच समजणार नाही, परंतु मोदी माझ्या घरापर्यंत पोहचले, हे त्यांचे वागणे,  बोलणे पंतप्रधान पदाला शोभत नाही. त्यांचे बोलणे सुधारले  नाहीतर, देशातील लोक त्यांना बाजूला सारतील. अशा इशाराही पवारांनी मोदींना दिला.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.