पुण्यातील व्यापाऱ्यांशी शरद पवारांनी साधला संवाद

लॉकडाउन सगळ्या व्यवसायांवरर परिणाम झाला आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. मार्केटचं विकेंद्रीकरण करायचं आहे असं पुण्यातल्या व्यापाऱ्यांच्या मनात आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्यापारी महासंघाच्या मनात व्यापारविषयक कायम स्वरुपी प्रदर्शन असावं असं आहे असंही पवार यांनी सांगितलं.राज्य सरकारने काही दुकानं आणि व्यवसाय सुरु करण्याची संमती दिली आहे. तरीही ग्राहकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे हवा तसा प्रतिसाद दिसत नाही असंही व्यापाऱ्यांनी सांगितल्याची माहिती पवार यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.