शरद पवार सुधारणांच्या बाजूने, राजकारणासाठी काहींचा यूटर्न, मोदींचा थेट पवारांना टोला

नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी २ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (८ फेब्रुवारी) पहिल्यांदाच संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपलं मौन सोडलं.

शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या योजना आणि कायद्याचं महत्त्व त्यांनी संसदेत अधोरेखित करतानाच विरोधकांवरही टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कृषी सुधारणांच्या बाजूने आहेत. काँग्रेससह अनेकांनी कृषी सुधारणांची वकिलीही केली. पण काहींनी राजकारणासाठी या कायद्यावरून यूटर्न घेतला, अशी अप्रत्यक्ष टीका नरेंद्र मोदी यांनी पवारांवर केली.

नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत कृषी कायद्यावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडले. आमचे आदरणीय शरद पवारजी यांनी कृषी सुधारणांची वकिली केली. शरद पवारांनी आताच सांगितलं मी कृषी सुधारणांच्या बाजूने आहेत. काँग्रेससह अनेक नेत्यांनीही कृषी सुधारणांच्या बाजूने असल्याचं सांगितलं. आता अचानक काही लोकांनी राजकारणासाठी यूटर्न घेतला. त्यासाठीच त्यांनी त्यांचे विचार मांडले, अशी अप्रत्यक्ष टीका मोदींनी पवारांवर केली.

कृषी कायद्याबाबत माझं म्हणणं ऐकू नका, पण किमान मनमोहन सिंग यांचं तरी म्हणणं ऐका. मनमोहन सिंग यांनी जे सांगितलं. तेच मोदी करत आहे, याचा अभिमान तर बाळगा, असं टोलाही त्यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणांचा उल्लेख केला. छोट्या शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आणली, आम्ही पहिल्यांदाच किसान रेल्वे आणली. याचा फायदा छोट्या शेतकऱ्यांनाच होत आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा