राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हरणार हे शरद पवारांना माहीत होते : रामदास आठवले

मुंबई : काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली होती. तसेच राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देशभरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षांकडून पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी पुढे आणले जात आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय स्तरावर अशा घडामोडी सुरू असताना स्वत: शरद पवार यांनी मात्र आपण या पदासाठी स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केलं होत. यानंतर यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी स्वत: निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यांच्या नावाबाबत बोलणे चांगली गोष्ट नाही, असे आठवले म्हणाले. तो एक महान नेता आहे. या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागणार हे त्यांनाच माहीत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी आता त्यांच्या नावावर बोलू नये. विरोधी पक्षांनी सहमतीने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार द्या, असे आवाहन आठवलेंनी केले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा