“पवारसाहेब, आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा” यासाठी कार्यकर्त्यांचं उपोषण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला निर्णय बदलून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी उपोषण सुरु केलं आहे. सात रस्ता येथील यशवंतराव पुतळ्याजवळ राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांचं उपोषण सुरु आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही असं शरद पवार यांनी नुकतेच जाहीर केलं होतं. मात्र त्यांनी आपला निर्णय बदलावा अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदार संघातून लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर,  शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून शरद पवार यांना भावनिक आवाहन केले होते.

Loading...

रोहित पवार यांनी शरद पवार यांना, माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा. असं आवाहन केलं होते.

माढ्यातून लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेताना शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट-

राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे पण सर्वसामान्य लोकं काय म्हणतात याकडे पवार साहेब नेहमीच लक्ष देतात. म्हणूनच गेली 52 वर्ष फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात देखील हिच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते अस सर्वसामान्य माणसांच मत आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा हा प्रवास भेदभावाच, जातीधर्माचं राजकारण न करता, गेली 52 वर्ष न थकता सर्वसामान्यांसाठी सुरू आहे, म्हणूनच पवार साहेबांच राजकारण कोणत्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून चालू होतं. हे मला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या दिवशीच अभिमानाने सांगू वाटतं.

एक कार्यकर्ता म्हणून,

“साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा.”

बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलच आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसही बेडकासारखं हवा भरून बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल.

रोहित पवार कोण आहेत?

राजकारणासह कृषीक्षेत्र आणि व्यवसाय क्षेत्रावर असणारे पवार यांचे प्रेम सर्वश्रुत आहे. पवार यांचा हाच वारसा आता त्यांच्या तिसऱ्या पिढीतील रोहित पवार हे सक्षमपणे सांभाळत आहेत.

रोहित सध्या बारामती जिल्हा परिषदेत सदस्य आहेत . शरद पवार याचे राजकारण आणि कै.आप्पासाहेब पवार यांचा कृषीक्षेत्रातील वारसा रोहित हे यशस्वीपणे सांभाळत आहेत. पुणे जिल्हापरिषदेचे सदस्य असणारे रोहित पवार हे समाजकारणातही अग्रेसर आहेत. तसेच बारामती अॅग्रोच्या माध्यमातून कृषी व्यवसायात असणारे त्यांचे काम देखील कौतुकास्पद आहे.

पवार या नावाचं वलय असताना देखील ते युवकांशी संवाद साधत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांच्याप्रमाणे शेतीसोबतच उद्योगजकांवर असणारे रोहित पवार यांचे प्रेम दिसून येते. त्यामुळेच युवकांमधील उद्योजक घडवण्यासाठी ‘सृजन’च्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. एकंदरीतच पवार घराण्याचे राजकारण आणि व्यवसाय याचा वारसा रोहित पवार हे सक्षमपणे पुढे घेऊन जातांना दिसत आहेत.

‘ही’ आहे पवारांची तिसरी पिढी; आजोबांकडून घेतायेत राजकारणाचे धडे…

पार्थ अजित पवार, रोहित राजेंद्र पवार आणि युगेंद्र श्रीनिवास पवार ही आहेत पवार आजोबांची नातवंडं. पार्थ हा अजित पवारांचा मुलगा. रोहित हा पवारांचे थोरले बंधू आप्पासाहेब पवार यांचा नातू. तर युगेंद्र हा अजित पवारांच्या धाकट्या बंधूचा मुलगा.

पार्थ पवार

पार्थ पवार, रोहित पवार आणि युगेंद्र पवार

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.