InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘अमित शाह यांना पाच वर्षांपूर्वी कोणी ओळखत होतं का?’

- Advertisement -

अमित शाह महाराष्ट्रात येऊन आम्ही काय केलं विचारतात, पण त्यांना पाच वर्षांपूर्वी कोणी ओळखत होतं का? असा
सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारला आहे. बीडमध्ये विजयसिंह पंडित यांच्या प्रचारावेळी पवार बोलत होते.

‘पाच वर्षांपूर्वी अमित शहा यांना कोण ओळखत होतं. आज ते महाराष्ट्रात येतात आणि आम्ही काय केलं, असा सवाल
आम्हाला विचारतात. आम्ही काय केलं हे विचारण्याचा अधिकार जनतेला आहे. अमित शाह, तुम्हाला नाही. तुम्हाला
महाराष्ट्राबद्दल काय माहिती आहे?’ अशा कठोर शब्दात शरद पवारांनी अमित शाहांचा समाचार घेतला.

Loading...

- Advertisement -

बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारवर निशाणा साधला.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.