InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड – शरद पवार

राज्यात 17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड आहे. सरकार स्थापनेसाठी अजून वेळ लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेटी दरम्यान पाहुण्यांशी चर्चेदरम्यान पवारांनी हे वक्तव्य केले.

शरद पवार दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी संध्याकाळी पवार यांनी मेकोसाबाग परिसरात आदिवासी परिषदेत सहभागी झाल्यानंतर कार्यकारी प्रदेशाध्यक्ष नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यासह ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक यशवंत मनोहर आणि ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे हे देखील उपस्थित होते. यावेळी 17 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा इतिहास बदलून द्यावा या भीष्माचार्याने, अशी आमची इच्छा आहे, असे डॉ. भाऊ लोखंडे पवारांना म्हणाले. यावर उत्तर देताना पवार यांनी ’17 ला अवघड आहे. अजून भरपूर वेळ लागेल’, असे उत्तर दिले.

Loading...

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.