शरद पवार-प्रशांत किशोर भेट राजकीय नाही, अजित पवारांचं स्पष्टीकरण

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून यापुढे काम न करण्याची घोषणा करणारे प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट सुरु आहे. ममता बॅनर्जी यांच्या विजयात मोलाचा वाटा असणारे प्रशांत किशोर शरद पवारांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

२०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकांचा चेहरा कोण असणार यासंबंधी सध्या विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची भाजपाविरोधात मोर्चेबांधणी सुरु असून यादरम्यान प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये होणारी ही भेट महत्वाची मानली जात आहे.

मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या असून प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट राजकीय नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आज पुण्यात ते बोलत होते. अजित पवार यांनी आषाढी वारीबद्दल देखील माहिती दिली आहे.

यावेळी पत्रकारांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीबद्दल विचारलंत्या. तेव्हा उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. प्रशांत किशोर आणि पवारांची भेट राजकीय नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. देशाचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा वडिलकीच्या नात्याने सल्ला घेण्यासाठी अनेक नेते भेटत असतात. त्यानुसारच प्रशांत किशोर त्यांना भेटत आहेत, असं पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा