Sharad Pawar Resign | पवारांनी लोकसभेपर्यंत तरी थांबावे; ‘या’ प्रमुख राष्ट्रीय नेत्यांनी व्यक्त केली इच्छा
Sharad Pawar Resign | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर देशभरातील नेते पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करत आहे. देशभरातील भाजपविरोधी पक्षांनी पवारांना निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे. जर पवारांना निर्णयावर ठाम राहायचे असेल, तर त्यांनी किमान 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हा निर्णय मागे घ्यावा, असं या नेत्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी, एम के स्टालिन यांनी पवारांशी (Sharad Pawar) संपर्क साधत विचारणा केल्याची माहिती मिळाली आहे. पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी भावना यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या समर्थकांनी गेल्या तीन दिवसापासून तळ ठोकला आहे. दिवसभर घोषणाबाजी करत कार्यकर्ते पवारांना राजीनामा मागे घेण्याची मागणी करत आहे.
दरम्यान, 2024 पर्यंत तरी शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर कायम राहावं. जून 2025 मध्ये राष्ट्रवादीचा अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनापर्यंत शरद पवार यांनीच अध्यक्षपदावर राहावं, असं राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे म्हणाले आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. “मी जो काही निर्णय घेतला आहे, तो पक्षाच्या भविष्यासाठी घेतला आहे. भविष्यात पक्षाचं कामकाज सुरळीत चालावं त्यातून एक नवीन नेतृत्व मजबूत करावं, हा माझा हेतू आहे, असं पवार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ODI World Cup | भारतातील ‘या’ स्टेडियममध्ये रंगणार IND vs Pak वर्ल्ड कप सामन्याचा थरार
- Weather Update | राज्यात आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका
- Ajit Pawar | शरद पवारांनी ठरवलं तर अध्यक्ष होणार का? अजितदादा काय म्हणाले?
- Abdul Sattar | “मी ‘कुत्रा’ निशाणीवर जरी लढलो, तरी जिंकणार” : अब्दुल सत्तार
- Job Opportunity | विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्रात नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Comments are closed.