Sharad Pawar Resignation | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष; तर “या” नेत्यांची समितीच्या बैठकीमध्ये उपस्थिती

Sharad Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तीन ते चार दिवस झालेले आहेत. तर मुंबईमधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बाहेर राष्ट्रवादीचे युवा- युवतींनी आंदोलन करत तळ ठोकला आहे. या सर्वांचा आणि राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या शरद पवारांनी राजीनामा माघारी घ्यावा इतकीच मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर काल (4 मे) पवारांनी सर्वांशी संवाद साधत लवकरच नेमलेल्या समितीच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल असं आश्वासन केलं, तुम्हाला फार वेळ असं बसावं लागणार नाही असं देखील पवार म्हणाले. यामुळे आज ( 5मे) समितीची बैठक सकाळी 11 वाजता मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात पार पडणार आहे. या बैठकीत अध्यक्षपदी कोण असणार? शरद पवारांना राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती करणारा ठराव दिला जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे सर्वांच लक्ष या समितीच्या बैठकीतुन काय निर्णय घेतला जातोय याकडे लागलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीमध्ये “या” नेत्यांचा समावेश (Including of “these” leaders in NCP committee)

जेव्हा शरद पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केली त्यावेळीच त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, नवीन अध्यक्षपद कोणाला दिल जाणार याबाबत एक समिती स्थापन केली जाणार आहे. त्या समितीच्या बैठकीतुन जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. त्याप्रमाणेच पवारांच्या मार्गदर्शनाखाली समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, एकनाथ खडसे, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार कालपर्यंत एकनाथ खडसे यांचं नाव या समितीत नव्हतं. परंतु शरद पवारांनी खडसेंच्या नावाचा समावेश करण्याची सूचना दिली त्यानंतर या समितीत खडसेंचा समावेश करण्यात आला असून शुक्रवारच्या बैठकीला येण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी खडसे यांना फोनही केल्याची माहिती मिळत आहे. यामुळे एकनाथ खडसे देखील समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार का? काय असेल शरद पवारांचं निर्णय? शरद पवारांनी राजकारणात पाऊल टाकल्यापासून अनेक राजकीय खेळी करत डाव जिंकले आहेत. यामुळे शरद पवारांनी अचानक राजीनामा देण्यापाठीमागे पवारांची कोणती खेळी असेल याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.