InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मोदींचे सरकार आले तरी, 13-15 दिवसात पडणार – शरद पवार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रत्येक जण राजकीय भाकिते करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता सरकारबद्दल भाकित वर्तवले आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी, हे सरकार अवघं १३ किंवा १५ दिवसांत कोसळेल, असे भाकित  शरद पवार यांनी वर्तवले आहे.

शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांच्या सरकारची अवस्था १९९६च्या वाजपेयी सरकारसारखी होईल. हे सरकार अवघं १३ किंवा १५ दिवसांत कोसळेल. भाजपच्या हातात सत्ता जाणार नाही. बाकीचे पक्ष एकत्र बसून स्थिर सरकार देतील, असेही पवार यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.