“शरद पवारसाहेब एका मुलीवर थांबले, मी दोनवर थांबलो, तुम्ही पलटन वाढवू नका” : अजित पवार

बारामती : बारामती तालुक्यातील वढाणे गावात रसिकलाल फाऊंडेशनच्या वतीने जनाई उजव्या कालव्यातून वढाणे गावच्या तलाव्यात पाणी सोडण्याच्या लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंब नियोजनावर भाष्य केलं.

अजित पवार आपल्या बेधडक बोलण्यासाठी ओळखले जातात. या कार्यक्रमात 50 वर्षापूर्वी शरद पवार साहेब एका आपत्यावर थांबले. मी म्हणत नाही की एका आपत्यावर थांबा पण दोन आपत्यावर थांबा पण पलटन वाढवू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

“कुटुंब नियोजन हे आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतं. मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही एकाच अपत्यावर थांबा, तुम्ही दोन अपत्य होवू देऊ शकता. पण उगाच जास्त नका होवू देऊ,” असा सल्ला अजित पवार यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, देशात झालेला लोकसंख्या विस्फोट हा देशाच्या विकासासाठी अडचण ठरत आहे. मर्यादित संसाधन आणि अनियंत्रित लोकसंख्या यांचा मेळ घालणं महत्वाचं बनलं आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे आपापल्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवत आहेत. त्यासाठी जनजागृती केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा