‘माझी चूक झाली उदयनराजेंना लोकसभेचं तिकीट दिलं’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज साताऱ्यात तुफानी पावसातही सभा घेतली. पवार बोलायला उभे राहिले आणि जोरदार पाऊस सुरु झाला. परंतु पवारांनी भर पावसातही सभा सुरुच ठेवली. यावेळी बोलताना पवारांनी साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी खूप मोठी चूक केली, मी उदयनराजे भोसलेंना साताऱ्यातून उमेदवारी दिली. भर पावसात भिजतच शरद पवारांनी भाषण केलं. यावेळी पवार उदयनराजेंवर बरसले.
काल सकाळी 10 वाजता पंढरपूर आणि त्यानंतर अंबाजोगाईची सभा केल्यानंतर शरद पवार यांची साताऱ्यामध्ये संध्याकाळी सभा होती. साताऱ्याच्या या सभेत शरद पवार काय बोलणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.

शरद पवार भाषणाला उभे राहिले आणि पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र त्या पावसातही शरद पवार यांनी भाजप – सेनेला चांगलेच झोडपून काढले.

Loading...

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.