InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शरद पवार दुष्काळ पाहणी दौऱ्यावर रवाना

शरद पवार हे आज मतदान करून दुष्काळी पाहणी दौऱ्यावर रवाना झाले. त्यांनी आज मुंबईत मतदान केले. जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे हे त्यांच्यासोबत होते.

शरद पवार यांचे ट्वीट

आजचा दिवस देशासाठी महत्त्वाचा आहे. स्थिर सरकार येणं आवश्यक आहे. मुंबईकरही मतदानात मागे न राहता मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावतील आणि लोक निर्णायक मतदान करतील अशी अपेक्षा आहे. #VoteKar #MumbaiVotes-  शरद पवार 

प्रचारादरम्यान महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीची भीषण दाहकता लोक पवारसाहेबांना सांगत होते. परिस्थितीची पाहणी करायला मी येईन असं आश्वासन शरद पवार यांनी त्यांना दिलं होतं. आज मतदान झाल्यावर ते सोलापूर आणि उस्मानाबादच्या दुष्काळी दौऱ्यावर रवाना झाले, अशी माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रवक्त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.