कृषी कायद्याबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे शरद पवारांनी केले स्वागत

मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायदे रद्द करण्यासाठी गेले अनेक दिवस शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. कृषी कायद्यावर लवकरात लवकर मोदी सरकारने कृषी कायद्याबाबत निर्णय द्यावा असे सुप्रीम कोर्टाने खडसावले होते. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांवरआणि शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमोर याप्रकरणी सुरु होत आहे. सर्वोच्च न्यायालयानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे.

महाराष्ट्रातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. शरद पवार यांनी ट्विट करत असं म्हटलं आहे की, सुप्रीम कोर्टाचा कृषी कायद्याबाबतचा निर्णय स्वागतार्ह आहे. आता तरी शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये बातचीत होऊन तोडगा निघेल, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. दरम्यान, शरद पवार यांनी कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली होती.

यानंतर पुढे केंद्र सरकारचा अत्याचार सहन करत शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर न्याय मागतोय. परंतु त्यांच्याके सरकारने लक्ष दिलं नाही किंबहुना त्यांचं म्हणणं समजून घेऊन त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. असंवेदनशील सरकारकडून अनेकदा चर्चा होऊनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय झाला नाही. कोर्टाच्या निर्णयानंतर आतातरी सरकारने शेतकऱ्यांची बाजू समजावून घेऊन त्यांना न्याय द्यावा, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.