InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

दुष्काळ प्रश्नी शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

- Advertisement -

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका संपताच शरद पवार दुष्काळी दौऱ्यावर असून ग्रामीण भागातील परिस्थितीचा ते आढावा घेत आहे. ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांसाठी चारा-पाण्याची टंचाई, सरकारने केलेली टँकर व्यवस्था याची पवारांनी माहिती जाणून घेतली. बीड जिल्ह्यात जिल्ह्यातील आष्टी, पाटोदासह अनेक गावांना त्यांनी भेट दिली. शेतकऱ्यांशी यावेळी त्यांनी संवाद साधला.

पिण्यासाठी दुषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.  त्यामुळेच, अशा भिषण परिस्थितीत कोणतेही राजकारण न करता सरकारने शेतकर्‍यांना मदत करावी, कामे नसल्याने नागरिकांच्या हाताला रोजगार नाही. अनेक शेतकर्‍यांना पीक विमा मिळालेला नाही. अशा चारही बाजूने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे लवकरात लवकर सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शरद पवार यांनी केली.

- Advertisement -

राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आपण, राज्य आणि केंद्र सरकारच्या पुढे मांडणार आहे. त्यासाठी, लवकरच मुख्यमंत्री  फडणवीस यांची मी स्वतः भेट घेणार असल्याचे शरद पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.