शरद पवारांचा राणे पुत्रांना सल्ला, वडिलांचे गुण अंगिकारल्यास शिखर गाठणे शक्य

दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या `झंझावात` या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. राणे यांच्या आत्मचरित्राला पवार यांनी प्रस्तावना लिहिली आहे. राणे यांनी शून्यातून सुरू केलेल्या राजकीय प्रवासाचे कौतुक करताना त्यांनी राणे यांच्या दोन्ही पुत्रांनाही एक सल्ला दिला आहे. हा सल्ला जर त्यांनी अमलात आणला तर त्यांचा अभ्युदय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

राणे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते मुंबईत दोन दिवसांपूर्वी झाले. त्या वेळीही पवार यांनी राणे यांचे अगदी मनापासून अभिनंदन केले. पवार यांच्याबद्दल आपल्या मनात नितांत आदर असल्याचा उल्लेख राणेंनी पुस्तकात अनेक ठिकाणी केला आहे. राणे यांच्या पुस्तकाला पवार यांनी प्रांजळपणे प्रस्तावना लिहिली आहे.

या प्रस्तावनेत पवार यांनी चार वाक्ये राणे यांच्या कुटुंबाबद्दल लिहिले आहेत. “त्यांच्या प्रचंड कार्यात सतत काळजी वाहणारी, खंबीरपणे साथ देणारी अर्धागिनी सौ. नीलमताई पत्नी म्हणून त्यांना लाभली आहे,“ त्यांचे पुत्रे निलेश आणि नितेश यांनाही मार्गदर्शनाचे चार शब्द सांगितले आहेत. “निलेश आणि नितेश हे दोन्ही मुलगेदेखील राजकारणात स्वत:ला सिद्धकरतांना दिसून येत आहेत. वडिलांमधील आक्रमकता, अनुकंपा, अनन्यसाधारण धडाडी, विनम्रता आणि मुख्य म्हणजे अभ्यासू वृत्ती हे गुण त्यांनी अंगिकारले, तर त्यांना राजकीय उच्च शिखर गाठता येणे शक्य आहे,“ असे पवार यांनी खात्रीपूर्वक नमूद केले आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.