InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मोदींना पवारांचे पत्र, पत्रातून मांडल्या साखर कारखानदारांच्या व्यथा

- Advertisement -

टीम महाराष्ट्र देशा- ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदार यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले आहे. यंदा अतिरिक्त झालेल्या ऊस उत्पादन आणि दराबाबत निर्माण झालेल्या गोंधळाबाबत, तसेच या उद्योगाशी संबंधित इतर समस्यांबाबत मोदींना पत्र लिहून ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांच्या व्यथा मांडल्या आहेत. तसेच, त्यावर योग्य उपाययोजनाही सुचवल्या आहेत.

या पत्रात शरद पवार यांनी केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ८५०० कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले होते त्याविषयीचा विरोधाभास नमूद केला आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोतर्फे जाहीर केलेल्या पत्रात मात्र हीच रक्कम ७००० कोटी रूपये अशी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुळात निव्वळ आर्थिक खर्च रूपये ४०४७ कोटी असताना, पॅकेजमध्ये जाहीर केलेले ८५०० कोटी अथवा ७००० कोटी हे दोन्ही आकडे सरकारकडून फुगवून सांगण्यात येत असल्याचे शरद पवार यांनी पत्रात लिहिले आहे.

Loading...

इथेनॉलच्या क्षमतेच्या वाढीसाठी व्याज सवलतीची योजना तयार करावी अशी सूचना त्यांनी केली आहे. या विशिष्ट निर्णयामुळे दोन वर्षांच्या अतिरिक्त साखर उपलब्धतेमुळे उद्भवणाऱ्या अडचणींमध्ये सुधारणा करण्यास मदत होणार नाही. मात्र ही योजना पुढील पाच वर्षांमध्ये ऊर्ध्वपातन क्षमता वाढविण्यास प्रोत्साहित करेल असेही ते पत्रात म्हणतात. इथेनॉलची निर्मिती आणि वापर वाढवण्यासाठी इथेनॉलची किंमत किमान ५३ रूपये प्रति लिटर असावी अशीही सूचना त्यात आहे. आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आणि इथेनॉलवरील १८ टक्के जीएसटी कमी करण्याने बाकीची अधिक रक्कम इथेनॉलच्या सध्याच्या मूलभूत किंमतीत (रु. ४०.८५ प्रति लिटर) वाढ करण्यासाठी वापरता येईल, असे त्यांनी सुचवले आहे.

- Advertisement -

Loading...

साखर उत्पादनाची सरासरी किंमत देशभरात साधारण ३४ ते ३६ रूपये असताना, साखरेची किमान विक्री किंमत २९ रूपये प्रति किलो ठेवण्याचा सरकारचा निर्णय योग्य वाटत नाही असे त्यांनी पत्रात लिहिले आहे. भौगोलिकदृष्ट्या पोषक असलेल्या उत्तर भारतात दर्जेदार साखरची निर्मिती होते तर इतर भागात साखरेचा दर्जा वेगळा असल्याने हा फरक लक्षात घेऊन सरकारने किमान विक्री किंमतीबाबत दोन वेगवेगळे पर्याय ठेवावेत, अशीही सूचना पत्रात करण्यात आली आहे.

साखर उद्योगातील अडचणींबाबत खा. शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्रऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदार यांच्या समस्यांकडे…

Geplaatst door Sharad Pawar op Zaterdag 9 juni 2018

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.