InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

चंद्राबाबू नायडू घेणार शरद पवारांची भेट; तिसरी आघाडीसंदर्भात निर्णय होणार??

गेल्या काही दिवसांपासून थंडावलेल्या भाजपविरोधी तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू गुरुवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

त्यामुळे या भेटीत तिसऱ्या आघाडीसंदर्भात काही ठोस निर्णय होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेच्या खुर्चीवरुन खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत तिसरी आघाडी स्थापन करण्याची तयारी सुरु केली होती. मात्र, या आघाडीचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे यावरून सुरु असलेल्या वादामुळे या आघाडीबाबत आतापर्यंत ठोस निर्णय होऊ शकला नव्हता.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply