शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या भेटीला संजय राऊत, चर्चांना उधाण

मुंबईः शिवसेनेचे नेते संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. वाय. बी. सेंटरमध्ये संजय राऊत व शरद पवार यांच्यात बैठक होत आहे. संजय राऊत अचानक पवारांच्या भेटीला आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याआधी सोमवारी मुंबईमध्ये वरळी येथील सेंट्रल हॉटेलमध्ये शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एसटी संपाच्या मुद्द्यावरुन बैठक झाली.

मात्र आज चार तास झालेल्या या बैठकीत काहीही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर विरोधकांनी पवारांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. यानंतर आता संजय राऊत हे पवारांना कोणत्या विषया संदर्भात भेटायला आले आहेत. याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मात्र, संजय राऊत अचानक शरद पवारांच्या भेटील आल्याने तर्क वितर्कांना लावले जात आहेत. संजय राऊत हे काही वेळापूर्वीच वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या भेटीसाठी संजय राऊत चव्हाण सेंटरमध्ये आले आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. या भेटीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा