Shardul Thakur । शार्दुल ठाकूरचा भारतीय संघात समावेश, या प्रमुख गोलंदाजाची जागा घेतली

मुंबई : वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याचा बेंगळुरू येथे खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी भारताचा अ संघात समावेश करण्यात आला आहे. जखमी प्रसिद्ध कृष्णाच्या जागी ठाकूरची संघात निवड करण्यात आली आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, कृष्णाने काही दिवसांपूर्वी पाठीच्या दुखापतीमुळे आपले नाव मागे घेतले होते. याच कारणामुळे तो या मालिकेतील पहिला सामनाही खेळू शकला नाही.

शार्दुल ठाकूरची दुलीप करंडक स्पर्धेसाठी पश्चिम विभागीय संघात निवड करण्यात आली होती परंतु आता भारत अ संघात निवड झाल्यामुळे त्याला त्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी पश्चिम विभागाच्या निवडकर्त्यांनी सौराष्ट्रचा डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाचा समावेश केला आहे. निवडकर्त्यांची रविवारी बैठक झाली आणि त्यानंतर २४ वर्षीय वेगवान गोलंदाजाची निवड केली.

पश्चिम विभागाची कमान अनुभवी अजिंक्य रहाणेकडे आहे. तर दिलीप ट्रॉफी 8 ते 25 सप्टेंबर दरम्यान तामिळनाडूमध्ये होणार आहे. भारत अ संघाचे नेतृत्व प्रियांक पांचाल करत आहे. शार्दुलची आशिया चषकासाठी निवड झाली नव्हती आणि त्यामुळेच ब्रेकच्या काळात तो थायलंडमध्ये सुट्टी घालवत होता. मात्र आता त्याला तातडीने परत येण्यास सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.