InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

एक्झिट पोलनंतर शेअर बाजारात जबरदस्त उसळी

लोकसभा निवडणुकीचा काल अंतिम टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. एक्झिट पोलच्या या अंदाजाने सोमवारी सकाळी शेअर बाजारात मोठी उसळी पहायला मिळाली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला. तर निफ्टी देखील 11 हजार 648 अंकांवर पोहोचला.

23 मे रोजी लोकसभेचे निकाल जाहीर होणार असून, पोल्सला शेअर बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे निकालानंतर शेअर बाजार आणखी उसळी मारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.