मीराबाई चानूचा जमिनीवर बसून जेवतानाचा फोटो शेअर करत आर माधवन म्हणाला…

मुंबई : ऑलिम्पिकमध्ये वेट लिफ्टिंगचं सिल्व्हर मेडल जिंकून मिराबाई चानूने भारताचे नाव जगात उंचावले आहे. दरम्यान मीराबाई चानूचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती घरी जमिनीवर बसून जेवताना दिसत आहे. हा फोटो चर्चेत असतानाच अभिनेता आर माधवननं देखील तिचा हा फोटो शेअर करत ट्वीट केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मीराबाई तिच्या घरातील किचनमध्ये जमिनीवर बसून जेवताना दिसत आहे. या फोटोमध्ये मीराबाईसोबत आणखी दोन व्यक्तीही जेवताना दिसत आहेत. मीराबाईचा हा फोटो ट्वीट करताना आर माधवननं लिहिलं, ‘यावर माझा विश्वासच बसत नाहीये. काही बोलायला माझ्याकडे शब्दही नाही आहेत.’

याशिवाय मीराबाईनंही तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती घरी बसलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करताना मीराबाईनं त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘अखेर २ वर्षांनंतर घरचं जेवण जेवताना चेहऱ्यावर वेगळंच समाधान येतं.’ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून आल्यानंतर मीराबाई चानूनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा