InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

गावकऱ्यांची अवस्था आणि त्यांच्या व्यथा ऐकून शर्मिला ठाकरे यांना अश्रू अनावर

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सध्या या पूरग्रस्त पाहणी करण्यासाठी सांगली कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. 14 आणि 15 ऑगस्ट रोजी त्या या दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ या गावाला भेट दिली. शर्मिला ठाकरे यांनी गावातील लोकांची भेट घेतली. तसेच त्यांचे सांत्वनही केले. यावेळी गावकऱ्यांची अवस्था आणि त्यांच्या व्यथा ऐकून शर्मिला ठाकरे यांना अश्रू अनावर झाले होते.

शर्मिला ठाकरे आज सकाळी 11 वाजता पुराचा तडाखा बसलेल्या सांगलीतल्या पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावाला भेट देणार होत्या. त्यानंतर दुपारी 2 वाजता सांगलीतल्या पूरबाधित लोकांची भेट घेऊन झालेल्या नुकसानाची पाहणी करणार होत्या. संध्याकाळी 4 वाजता मिरज शहरातल्या कृष्णा घाट परिसरातील पूरग्रस्त लोकांची भेट घेऊन जनावरांच्या छावणीची पाहणी करणार होत्या. त्यानंतर 5 वाजता त्या कोल्हापूरच्या दिशेनं रवाना होणार आहेत.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.