InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शशिकला यांच्या जीवनावर चित्रपट

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिताच्या निकटवर्तीय व्ही. के. शशिकला यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार आहे. याबाबत ट्विटरवर राम गोपाल वर्मा यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
ट्विटमध्ये रामू यांनी लिहिले, की शशिकला ही मन्नारगुडी माफिया फॅमिलीतील ‘डॉन विटो कार्लिओनो’ आहे. तिला नकार दिलेला आवडत नाही, शशिकला आणि जयललिता यांच्यातील खरे संबंधही चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. शशिकला आणि जयललिता यांच्यातील संबंध कसे होते हे मला पोयस गार्डनमधील नोकरांनी सांगितले आहे. हे खूपच अकल्पनीय आणि धक्कादायक आहे आणि ते मी दाखवणार आहे, असेहीराम गोपाल वर्मा ने लिहिले आहे. आता हा चित्रपट किती यशस्वी होतो हे चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल.

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.