शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती : शरद पवार

सातारा : जिल्हा बँक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या झालेल्या पराभवामुळं त्यांचे समर्थक कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी थेट पक्षाच्या कार्यालयावरच दगडफेक केली आहे. शिंदे समर्थकांनी थेट पक्षालाच आव्हान दिल्याचं बोललं जात असताना, शिंदे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. ‘माझ्या कार्यकर्त्यांकडून भावनेच्या भरात चूक झाली आहे, असाही ते म्हणाले.

तसेच मी पवार साहेबांची माफी मागतो, पण माझ्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न किती झाले याबद्दल मला शंका आहे, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं येत्या काळात राष्ट्रवादी अंतर्गत संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. शशिकांत शिंदे यांना रांजणे यांच्याकडून अवघ्या एका मतानं पराभव पत्करावा लागला आहे. शशिकांत शिंदे यांना आपल्याच पक्षाच्या नेत्यांनी पराभवाचा धक्का दिल्याचं सध्या साताऱ्यात बोललं जात आहे.

शिंदेंच्या पराभवावर आत खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात पुढे महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. कार्यकर्त्यांनी याबाबत जागृत करणं रगजेचं आहे. अनेक तरुण नेत्यांशी मी आज संवाद साधला. शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती. शशिकांत शिंदे यांचा निवडणुकीत एका मताने पराभव झाला. ही स्थानिक पातळीवरची निवडणूक होती. मविआ म्हणून आम्ही निवडणूक लढवलेली नाही. असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा