InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

“पंतप्रधान हा अखिलेश यादव, मायावती यांच्यासारखा असावा”

- Advertisement -

पंतप्रधान हा सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा अध्यक्ष मायावती यांच्यासारखा असावा, असे वक्तव्य काँग्रेसचे पाटणा साहिबचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे.

काही दिवसांपुर्वीच भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या या वक्तव्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांच्यामध्ये पंतप्रधानपदी काम करण्याची क्षमता आणि गुण आहेत. काम करण्याची तत्परता आहे, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले. अखिलेश यादव यांच्यात काम करण्याची खुप क्षमता आहे. ते युवा शक्तीचं प्रतीक आहेत. त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशात चांगलं काम केलं आहे. मी त्यांना केवळ उत्तर प्रदेशचं भविष्य नाही, तर देशाच्या भविष्यातील नेतृत्तवाच्या रुपात, पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून पाहतो, अशा शब्दात शत्रुघ्न सिन्हा यांनी अखिलेश यादव यांची स्तुती केली.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.