शत्रुघ्न सिन्हांची मुलगी सोनाक्षी होणार सलीम खान यांची सून?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र, सोनाक्षी कधी तिच्या रिलेशनशिप किंवा मग तिच्या लग्नाच्या चर्चा झाल्या नाही. दरम्यान आता अशा चर्चा आहेत की सोनाक्षी सोहेल खानचा मेहुणा बंटी सचदेवाशी लग्न करणार आहे.

वृत्तानुसार, सोनाक्षी म्हणाली की शाळेत असताना तिला खरे प्रेम झाले होते. पण ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तिने त्या मुलाला बाय म्हटलं आणि पुढे निघाली. ५ वर्षांपेक्षा जास्तवेळ सोनाक्षी त्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण तिने त्या मुलाचं नाव सांगितलं नाही. तर तो मुलगा बंटी सचदेवा असल्याचे म्हटले जाते.

दरम्यान, सोनाक्षी आणि बंटी दोघांचे पार्ट्यांमधले बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एवढंच काय तर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने सोनाक्षीला चित्रपट सृष्टीत लॉन्च केलं आणि आता सोनाक्षी त्याच्या कुटुंबाचा एक भाग होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र या विषयी अजून कोणीही काही स्पष्टीकरण दिलं नाही आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा