Sheetal Mhatre | “शीतल म्हात्रेंचं आयुष्य बरबाद होईल”; व्हायरल व्हिडीओवर भाजप आमदार आक्रमक

Sheetal Mhatre | मुंबई : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा सोबतचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन राजकारणात मोठा वाद सुरु आहे. आज याच मुद्द्यावरुन विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

भाजपच्या आमदार मनिषा चौधरी (Manisha Chaudhari) यांनी शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आल्याचं सांगत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी मनिषा चौधरी यांनी ‘या प्रकारामुळे शीतल म्हात्रेंचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो’, अशी काळजी व्यक्त केली. त्या सोमवारी सभागृहात बोलत होत्या.

व्हायरल व्हिडीओ प्रकरणी भाजप आमदार आक्रमत

“एका आमदारासोबत महिला कार्यकर्तीचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. ही अतिशय निंदनीय बाब आहे. हा व्हिडीओ पहिल्यांदा कुणी मॉर्फ केला त्याला शोधून काढावं. आज हा प्रकार आज एका आमदार आणि महिलेबरोबर झाला, उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते. कारण कुठलाही माणूस कुठल्या स्तरावर जाऊ शकतो ते आम्ही व्हिडीओत बघितलं. त्या उद्घाटनाला मीही उपस्थित होते. महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते,” असे मनिषा चौधरी यांनी सांगितले आहे.

Manisha Chaudhari talk about Sheetal Mhatre’s viral video 

“एखादा डोकेफिरू नवरा असेल, तर त्या महिलेचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. एखादा पुरुष आमदार असेल, तर त्या महिलेचं डोकं फिरून तीही त्या पुरुषाला आपल्या संसारातून बाहेर काढू शकते,” असंही चौधरींनी नमूद केलं. “या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बरबाद होईल”, असे मनिषा चौधरी म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.