‘रात्रीस खेळ चाले’तून शेवंताची एक्झिट; जाताना सांगितले धक्कादायक अनुभव

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘रात्रीस खेळ चाले’मधील शेवंता म्हणजेच अपुर्वा नेमळेकर मालिकेतून बाहेर जाणार असल्याची चर्चा सुरू होती. अशातच आपण स्वत: ही मालिका सोडणार असल्याचं अपुर्वाने सांगितलं आहे. त्याचबरोबर जाता जाता अपुर्वाने सिनेसृष्टीतले काळे कारनामे देखील सांगितले आहेत.

“मला प्रोडक्शन हाऊसकडून सांगण्यात आलं होतं की, तिसऱ्या सिझनच्या शुटींगसाठी तुमचे केवळ 5 ते 6 दिवसच लागणार आहेत म्हणून मी नकार दिला होता. त्यावेळी मला आणखी एक शो देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांनी ते आश्वासन पाळलं नाही. त्यामुळे माझं आर्थिक नुकसान झालं आहे,” असं अपुर्वा नेमळेकर हिने म्हटलं आहे.

पुढे अपूर्वा म्हणाली, “शेवंताच्या भूमिकेसाठी मी 10 किलो वजन वाढवलं होतं. त्यावेळी सेटवर काम करत असताना काही ज्येष्ठ कलाकारांनी वजनावरून माझं विडंबण केलं. त्यावेळी माझी सर्वांसमोर खिल्ली उडवली गेली होती. माझ्या मनाला लागतील अशा काही गोष्टी जाणीवपुर्वक केल्या गेल्या. त्यानंतर माफी देखील मागितली नाही”.

दरम्यान, मला अपमानास्पद वागणूक मिळत होती. माझं आयुष्य याच ठिकाणी थांबलं नाही त्यामुळे मी हा शो सोडण्याचा निर्णय घेतल्याचं अपुर्वाने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा